बॉलीवूड अभिनेता आमिर खानने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॉयकॉट ट्रेंडमुळे प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली अन तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तेव्हा त्याने काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता, या ब्रेकनंतर आमिर खान बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘स्त्री’ या गाजलेल्या चित्रपटाचा निर्माता दिनेश विजानच्या आगामी चित्रपटात तो झळकणार असल्याचे बोलले जात आहे. (Aamir Khan in Ujjwal Nikam Biopic)
आमिर खानला नेहमीच वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. शिवाय, खऱ्याखुऱ्या व्यक्तींच्या चरित्रांवर प्रेरित भूमिका अगदी उत्तम साकारत असल्यामुळे आमिरला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. ‘मंगल पांडे : द राइजिंग’, ‘दंगल’ यांसारखे बायोपिक चित्रपट करणारा आमिर खान आता ज्येष्ठ सरकारी वकील ऍड. उज्जवल निकम यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करणार आहेत. कोरोना काळापूर्वी आमिरला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती, तेव्हा अनेक निर्मात्यांनी या बायोपिकसाठी प्रयत्न केले होते. पण आता दिनेश विजन यांनी आमिरसह हा चित्रपट बनवणार असल्याचं ठरवलं आहे.
हे देखील वाचा – काजोलच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, ऑफिससाठी घेतली इतकी महागडी जागा
याआधी चित्रपट निर्माते उमेश शुक्ला यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान आपण ऍड. उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकवर काम करत असल्याची पुष्टी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
हे देखील वाचा – “जगाचे नियम मोडून…”, शिवानी सुर्वेसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला, “आपल्या वागण्यावर…”
दरम्यान, ऍड. उज्वल निकम यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ते विशेष सरकारी वकील आहेत. १९९३ बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २६/११ दहशतवादी हल्ला अशा अनेक प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर आता उज्वल निकम यांच्या बायोपिकमधून बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार का? हे पाहावे लागेल. (Aamir Khan will comeback from Adv. Ujjwal Nikam Biopic)