रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खऱ्या आयुष्यातही बाप लेकाची केमिस्ट्री रंगणार आता मोठ्या पडद्यावरही, जॉनी लिव्हर – जेसी लिव्हर ‘अफलातून’ चित्रपटातून येणार समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2023 | 4:40 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Johnny Lever and Jessey Lever

Johnny Lever and Jessey Lever

वडील मुलांच नातं हे सगळ्या नात्यांच्या पलीकडील आहे. सिनेमाविश्वात अशी अनेक बाप लेकाची जोडी आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या कलागुणांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय. अशीच बाप लेकाची आणखी एक जोडी सिनेसृष्टी गाजवायला सज्ज होत आहे. खरतर चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होतोय ती जोडी म्हणजे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर आणि त्यांचा मुलगा जेसी लिव्हर. ‘अफलातून’ या मराठी चित्रपटातून ही बाप लेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. (Johnny Lever and Jessey Lever)

लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी वडील आणि मुलाला एकत्र आणण्याची किमया या चित्रपटात पेलवली आहे. ‘अ डिफेक्टीव्ह कॅामेडी; असं म्हणत ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साहा अँड सन्स स्टुडिओज’, ‘आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी’ आणि राजीव कुमार साहा निर्मित आणि ‘ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट’, ‘अवधूत डिस्ट्रिब्युटर’ आणि ‘स्वर्ण पटकथा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

पाहा मोठ्या पडद्यावर रंगणार बाप लेकाची केमिस्ट्री (Johnny Lever and Jessey Lever)

जॉनी लिव्हर यांच्या अभिनयाची क्रेझ सर्वत्र आहेच. विनोदाचा बादशाह म्हणून जॉनी लिव्हर याने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. आता ‘अफलातून’ च्या माध्यमातून आपल्या मुलासोबत ते एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात ही जोडी वडील आणि मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात जॉनी लिव्हर ‘नवाब साहब’ च्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या मुलाची ‘आफताब’ची भूमिका जेसी लिव्हरने साकारली आहे. ‘अफलातून’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचंही दोघांनीही म्हटलंय. (Johnny Lever and Jessey Lever)

या दोघांसोबत ‘अफलातून’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकवर्गाकडून याला उदंड प्रतिसाद मिळतोय. (Johnny Lever and Jessey Lever)

हे देखील वाचा – ‘हे यश बघायला दादा हवे होते’ सुचित्रा बांदेकर भावुक

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. तर छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी स्वरबद्ध केलं आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहे.

Tags: aflatoonbollywood actorentertainmentits majjajessey leverjohnny levermarathi moviemarathimovietrailer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Digpal Lanjekar Social Work

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारक उभारणीसाठी दिग्पाल लांजेकर यांचा मदतीचा हात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.