स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीची भेट तर झालीय. (jaydeep) पण ज्या शालिनीमुळे जयदीप-गौरीला एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं तिला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. शालिनीला तिच्या पापांचं प्रायश्चित देण्यासाठी जयदीप वेष पालटून शिर्केपाटलांच्या घरात दाखल होणार आहे. यासाठी जयदीप(jaydeep) वृद्धाचं रुप धारण केलं असून तो लक्ष्मी इण्डस्ट्रीजचा मालक म्हणजेच जयवंत देशमुख असल्याचं भासवणार आहे.
खरतर शालिनीने चिमुकल्या लक्ष्मीला जीवे मारण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला. लेकीच्या प्रेमापोटी जयदीपला(jaydeep) शिर्केपाटलांच्या घरापासून दूर रहावं लागलं. गौरीपासूनही तो दुरावला. मात्र आता जयदीप गौरी एकत्र आलेत. आपल्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीला दिलेल्या त्रासाचा बदला जयदीपला घ्यायचा आहे. यासाठीच त्याने नवं रुप धारण केलं आहे. शालिनी पैशांची लोभी आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. लक्ष्मी इण्डस्ट्रीजचा मालक घरी आलाय म्हण्टल्यावर त्याच्या पैश्यांवरही शालिनीचा डोळा आहे. पैसे मिळवण्यासाठी ती काहीही करु शकते. त्यामुळे जयवंत देशमुख हा नवा अवतार धारण केलेल्या जयदीपच्या (jaydeep) तालावर शालिनी कशी नाचणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतंचे पुढील भाग रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.(jaydeep)
======
हे देखील पाहा – महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे अखेर विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रतापचं स्वप्न झालं पूर्ण
======