रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बेडरुममध्ये मुलासह मला वडिलांनी पकडलं अन्…”, जान्हवी कपूरचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “वडील आले तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 27, 2024 | 1:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Janhvi Kapoor shared the incident of she was caught with a boy in the bedroom

"बेडरुममध्ये मुलासह मला वडिलांनी पकडलं अन्…", जान्हवी कपूरचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "वडील आले तेव्हा…"

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्याच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही आपल्या स्टायलिश फोटोंनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय राहत असते. तिच्या अनेक फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. लवकरच ती ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसणार आहे आणि याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने ती सध्या मुलाखती देत असून नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या एका मित्राबद्दल भाष्य केले आहे. जान्हवीने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. जान्हवीला तिच्या वडिलांनी एका मुलाबरोबर बेडरूममध्ये एकत्र पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल तिने भाष्य केले आहे. ‘Mashable India’शी दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने या प्रसंगाविषयी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

या प्रसंगाबद्दल जान्हवीने असं म्हटलं की, “आम्ही आमच्या जुन्या घरात राहत होतो. तेव्हा मी एकदा माझ्या एका मित्राला माझ्या घरी बोलावले होते. त्यावेळी घरी कोणी नव्हते आणि आम्ही दोघे बेडरूममध्ये बोलत होतो. पण तेवढ्यात वडील घरात आले आणि घाबरून मी मुलाला दरवाजाऐवजी खिडकीतून खाली उडी मारायला लावली”.

आणखी वाचा – ‘सिंह’ व ‘तूळ’ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होणार, इतर राशींच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

यापुढे जान्हवीने असं म्हटलं की, “मला वाटले की जर तो खिडकीतून पळून जाईल तर वडिलांना याचा सुगावाही लागणार नाही. पण वडिलांनी सर्व काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिलं आणि माझा प्लॅन फसला. याची शिक्षा म्हणून माझ्या वडिलांनी घरच्या सर्व खिडक्यांना ग्रील लावले”.

आणखी वाचा – विरोचकालाही पाचव्या पेटीचे संकेत, नेत्रा व रुपाली यांच्यापैकी नक्की कुणाच्या हाती लागणार पंचपिटीका?

दरम्यान, जान्हवीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकदा भाष्य केले आहे. आईच्या निधनानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी जान्हवी व खुशी या दोन बहिणींचे संगोपन केले. अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच तिने केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsjanhvi kapoor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
Shahrukh Khan Enjoying Victory Of KKR

KKRचा विजय होताच शाहरुख खानने आनंदाच्या भरात बायकोला किस केलं अन्…; भलताच भारावून गेला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.