‘इंडियन आयडॉल १२’ चा विजेता पवनदीप राजन याचा सोमवारी (५ मे) रोजी एक भयंकर कार अपघात झाला. सुप्रसिद्ध गायकाच्या अपघाताच्या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला. त्याच्या अपघातादरम्यानचे फोटो समोर आले. त्यानंतर अपघाताची भीषणता किती असू शकते? हे प्रथमदर्शनीच लक्षात आलं. तातडीने गायकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघाताची स्थिती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये नेण्यात आले. तेव्हापासून गायकाच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळालं. मात्र आता गायकाचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तो हसताना दिसला. आता गायक धोक्याबाहेर आला असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हा फोटो इंटरनेटवर देखील व्हायरल होत आहे. (Pawandeep rajan accident health update)
पवनदीप राजन याचे ५ मे रोजी उत्तर प्रदेशातील मोरादाबादजवळ कार अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कॅन्टर ट्रकला त्याची कार धडकली. अपघातात वाहनाचे वाईट नुकसान झाले आणि पवनदीपशिवाय इतर दोनजण गंभीर जखमी झाले. प्रथमोपचारानंतर पवनदीपला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. असे सांगितले जात आहे की, त्याचे हात आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत. व्हायरल फोटोमध्ये तो रुग्णालयाच्या पलंगावर झोपलेला आहे आणि त्याचा चेहरा देखील सूजला आहे. मात्र या दुखापतीतही तो हसताना दिसत आहे.
आणखी वाचा – गरिबांचा वाली नाहीच! एक हजार रुपयांसाठी रुग्णवाहिका नाकारली, कल्याणमध्ये महिलेचा मृत्यू अन्…; संतापजनक घटना
तब्बल सहा तास गायकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जिथे जिथे मोठे फ्रॅक्चर होते तिथे आधी ऑपरेट करण्यात आलं. आता तो आयसीयुमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. तीन-चार दिवसांनंतर फ्रॅक्चर व इतर दुखापत या संदर्भात पुन्हा ऑपरेशन होणार असल्याचं समोर आलं. दरम्यान, गायकाचा आयसीयु मधील फोटो पाहून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं समोर आलं. चाहत्यांनी पवनदीपसाठी केलेली प्रार्थना त्याला फळली आणि त्याची तब्येत सुधारत असल्याचं समोर आलं.
गायकाने ‘इंडियन आयडॉल १२’ हे पदक जिंकले. तसेच २५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक कारही त्याच्या नावे केली. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्याने तबला वादक या पुरस्कारही जिंकला.