प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर अनेकदा चर्चेत असतात. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ने महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अशी उपमा त्यांना मिळाली. त्यांची सुस्पष्ट वाणी व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याच्या पद्धतीने साऱ्यांना वेड लावले. संपूर्ण महाराष्ट्रात या आदेश यांचे लाखो चाहते दिवाने आहेत. आदेश यांनी कायमच त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या कलेने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयासह सोशल मीडियावरही आदेश बऱ्यापैकी सक्रिय असतात. (Aadesh Bandekar On Father)
सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. शिवाय आदेश बांदेकर हे त्यांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून वेळ देत असतात. कुटुंबीयांबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो ते नेहमीच शेअर करताना दिसतात. अशातच आदेश यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आदेश यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या खास पोस्टची सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
आदेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आमच्या कुटुंबाची शक्ती. पप्पांना ९१व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि सुदृढ दिर्घायुष्यासाठी प्रार्थना”, असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांची खास छायाचित्रे व्हिडीओद्वारे शेअर केली आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच कलाकार मंडळींनीही आदेश यांच्या वडिलांना वाढिदवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत.
काही वर्षांपूर्वी आदेश बांदेकर यांचे वडील चंद्रकांत यशवंत बांदेकर यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. स्वत: आदेश बांदेकरांनीहा व्हिडीओ सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये नव्वदी गाठलेले चंद्रकांत बांदेकर सुस्पष्ट आवाजात त्यांच्या बालपणीची कविता म्हणताना पाहायला मिळाले. आदेश बांदेकर यांनी हा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले की, ‘माझे वडील चंद्रकांत यशवंत बांदेकर हे आमच्या कुटुंबाची उर्जा. ९० व्या वर्षी त्यांच्या शाळेतल्या कविता त्यांना आजही मुखोद्गत. नमस्कार त्यांच्या स्मरणशक्तीला.”