बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल खांब – खांब हा कॅप्टनसी टास्क रंगला.या टास्क दरम्यान नेहमीप्रमाणे सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद आणि भांडण झाली.शिव आणि आरोहमध्ये झालेल्या झटापटीमुळे बिग बॉस यांनी कार्यासाठी दिलेल्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले,असे हिनाचे  मत आहे  आणि त्यामुळेच हीना या टास्कची संचालिका असल्याने तिने दोघांदेखील बाद केले.  आरोहचे म्हणणे होते शिवने त्याला धक्का दिला तर शिवचे म्हणणे होते असे काही झाले नाही. 

आरोहने शिववर तो चिटिंग करत आहे असा आरोप केला.यावेळेस हीनाने बर्‍याचदा तिने घेतलेला निर्णय बदलला.आणि आज बिग बॉस असे जाहीर करणार आहेत, “हीना यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कॅप्टनसीच्या निर्णय प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला इम्युनिटी मिळते त्याच कार्यात केलेल्या मोठ्या चुकीची शिक्षा म्हणून बिग बॉस हीना यांना ...” हीना बिग बॉस यांच्या शिक्षेस पात्र का ठरली ? हीनाने कोणता चुकीचा निर्णय घेतला ? 

आता बघूया हीनाला तिच्या चुकीची कोणती शिक्षा बिग बॉस देणार. नक्की हीनाने कोणती चुकी केली ? जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर