मराठी चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे गेल्या डिसेंबरपासून कर्करोगाशी सामना करत आहेत. आणि आता औषधोपचार व किमो थेरेपीच्या मदतीने, कर्करोगाशी दोन हात करत, त्यांनी कर्करोगावर मात केली आहे. आणि पुन्हा एकदा रंगभूमी साठी स्वतःला तयार केले आहे. 

मी नथुराम गोडसे या नाटकांमधून आपल्या अभिनयाची कारकीर्द सगळी कडे पसरवलेला हा रंगकर्मी, गेल्या काही महिन्यापासून कर्करोग सोबत दोन हात करत त्यामध्ये यशस्वी सुद्धा झाला आहे. राजेश देशपांडे दिग्दर्शित हिमालयाची सावली, या नाटकांमधून पुन्हा एकदा ते रंगभूमी वर आपले पदार्पण करणार आहे.  नुकतेच बोरीवली येथील  प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सर्व कलाकार मंडळी तालमीसाठी जमले असताना, शरद पोंक्षे यांना ओळखणं देखील कठीण झालं होतं. असं त्यांच्या सहकलाकारांचे मत होत. 

स्वतःच्या तब्बेतीबद्दल सांगताना ते म्हणाले कि, या आजारातून बाहेर पडण्यासाठी मला सावरकरांची मदत झाली. त्यांनी अकरा वर्षे एका छोट्या खोलीत काढली होती आणि मला तर काही महिने काढायचे होते. हाच विचार माझ्या डोक्यात असायचा आणि यामुळेच मी आज इथे आहे. 

या नाटकाच्या नव्या संचाबद्दल बोलताना दिग्दर्शक राजेश देशपांडे सांगतात की, ‘‘एक अभिजात कलाकृती पुन्हा रसिकांसमोर सादर करणे आमच्यासाठी एक जबाबदारीच आहे. कानेटकरांच्या लेखनाला कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन नव्या संचात हे नाटक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अभिजात कलाकृती पुन्हा पहायला मिळणे हे अगोदरच्या पिढीतील प्रेक्षकांसाठी स्मरणरंजन असेल तर नव्या पिढीला जुन्या कलाकृतींचे सामर्थ्य यामुळे लक्षात येईल’’ असे राजेश देशपांडे सांगतात.

नव्या संचामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी केलेली नानासाहेबांची भूमिका साकारणार असून  त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, मीनल बाळ, कृष्णा राजशेखर आदि कलाकार या नाटकामध्ये दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. वेशभूषा मंगला केंकरे यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत. अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.

याच दरम्यान, राजेश ने मला हे नाटक वाचायला दिल, तेही मी वाचून काढलं, आणि माझ्या राजेश व निर्माते गोविंद चव्हाण थांबले होते. याचा मला विशेष आनंद आहे. म्हणून मी दुप्पट उर्जेने बाहेर आलो. लवकरच रंगभूमी साठी झटणारा हा कलाकार आपल्याला रंगभूमी वर दिसणार आहे. यामध्ये काहीच वाद नाही.