मात काही चूक किंवा बरोबर नसत. प्रेमासाठी माणूस कुठल्याही आव्हानाला, कुठल्याही परीक्षेला सामोरा जातो. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी कुठलाही त्याग करायला तयार असतो.सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेमध्ये देखील सिध्दार्थचा प्रेमाच्या वाटेवरचा प्रवास आता सुरु झाला आहे...

सिद्धार्थ आणि अनुच्या नात्याला अनेक छटा आहेत.सिध्दार्थच्या नकळत अनु बरोबरच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. दुर्गाला हे कळताच तिने अनुला सिध्दार्थच्या आयुष्यातून काढून टाकण्याचे बरेच प्रयत्न केले,बरीच कट कारस्थान केली पण त्याचा काहीच उपयोग झाली नाही... सानवीने देखील अनुला सिद्धार्थपासून दूर करण्याचा प्रयत्न केला.पण कुठेतरी अनुचा चांगुलपणा, साधेपणा सिध्दार्थला पटला आणि तो तिच्या प्रेमात पडला.

आता सिध्दार्थच्या प्रेमाची खरी कसोटी लागणार आहे कारण, अनुवर त्याचे प्रेम आहे हे तो कबूल करणार आहे.याची कल्पना दुर्गाला पहिल्यापासूनच आहे आणि म्हणूनच दुर्गा सिध्दार्थला बजावून सांगते कि, अस केलसं तर तुला घर, संपत्ती सगळ सोडून जाव लागेल.सिध्दार्थ प्रेमासाठी अनपेक्षित निर्णय घेतो आणि घर, संपत्ती, व्यवसाय सोडून देतो.

खऱ्या अर्थाने आता सिध्दार्थच्या प्रेमाची परीक्षा सुरु झाली आहे. सिद्धार्थ अनुला मागणी घालू शकेल का ? सिद्धार्थसमोर कुठली आव्हानं येतील ? तो त्यांना कसा सामोरा जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे,तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.