बिग बॉस मराठी सिझन २ चा सदस्य अभिजित बिचुकले बऱ्याच गोष्टींसाठी चर्चेत आहेत. आता अभिजित बिचुकले ह्यांना अटक करण्यात आले आहे ३५ हजारांचा चेक बाउन्स झाल्यामुळे सातारा पोलिसांनी थेट मुंबई गाठली आहे. गोरेगाव फिल्मसिटी मध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकले ह्यांना अटक केले आहे. 

१ ते १० क्रमांकावर उभे राहण्याचा टास्क बिग बॉस ने सदस्यांना दिला होता त्यामध्ये रुपालीशी खालच्या पातळीची भाषा वापरून आधीच प्रेक्षकांमध्ये स्वतःचे स्थान कमी केले आहे. शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले ह्यांची छान गट्टी जमली होती परंतु शिवानीच्या अचानक घराबाहेर जाण्याने हिना पांचाळ ची एंट्री झाली. आणि आता अभिजित आणि हिना ह्यांची  गट्टी जमली आहे. 

सुरवातीपासूनच आपल्या विशिष्ट देहबोलीने आणि भाषाशैलीने बिचुकले ह्यांनी सर्वांची मने जिंकली. परंतु त्यांच्या असभ्य वागण्याने हेच बिचुकले काही प्रेक्षकांच्या मनातून देखील उतरले. 

बिचुकले ह्यांना अटक केल्यामुळे आता पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांधणे खरंच खूप कठीण आहे. बिचुकले पुन्हा घरात येतील का..? नक्की पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका बिग बॉस फक्त कलर्स मराठीवर.