बिग बॉसच्या घरामध्ये वाद नाही झाला असं होण अशक्यच. जसे जसे दिवस वाढत जातील तसे तसे वाद वाढणार कारण प्रत्येकाच्या सवयी, स्वभाव हा खटकणार मागचा संपूर्ण आठवडा आपल्या सगळ्यांचे आवडते विद्याधर जोशी म्हणजे बाप्पा अत्यंत शांतपणे, सांमजसपणे सगळ्यांना सांभाळून घरात वावरताना दिसले. पण आज मात्र विणा आणि विद्याधर जोशींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. ज्यामध्ये बाप्पा जोशी “मी ईथे कुणालाही सुधारायला आलो नाही” असे वीणाला सांगितले.  

या भांडणामध्ये किशोरी शहाणे आणि पराग दोघांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला . या वादा दरम्यान अजून एक मुद्दा वीणा अधोरेखित करताना दिसली आणि तो म्हणजे जेंव्हा तिकडच्या मुली शिव्या देतात तेंव्हा बाप्पा म्हणतात “आपल्या मुलीने शिवी दिली, ठीक आहे” आणि आम्ही काही बोलो तर partiality होते हे बरोबर नाही,इतक्यावरच हे संपले नाही वीणाने विद्याधर यांना तू काड्या करतोस, आग लावतो असे देखील सुनावले.वीणाला विद्याधर जोशी यांनी बिंडोक असे म्हंटले आणि ज्यामुळे ती खूप चिडली.

एकमेकांवरचे हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले.आता या वादाचे पुढे काय होणार ? कोण नमतं घेणार ? हे  आजच्या भागामध्ये कळेल.तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.