स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या म्हणजे 24 मेच्या भागात आपण पाहणार आहोत. दिपा सुधाला रिकाम्या जागेत पुन्हा हॉटेल सुरू करण्याचा प्लॅन देते. सुधा तिला आठवलेंना कोण समजावणार म्हणते. दिपा तिला त्यांचं अर्ध राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करू म्हणते. तिथे आठवले य़ेतात. दिपा त्यांच्याशी बोलायला जाते तेव्हा ते तिला मध्ये बोलू नकोस, मी सुधाशी बोलतोय म्हणतात. सुधा त्यांना दिपाने दिलेली आयडीया सांगते. आठवले दिपावर चिडत हिचा आपल्या घरावर आणि शॅकवर डोळा आहे म्हणतात. जराशी माया दाखवली तर हातपाय पसरवायला लागलीस म्हणतात. सुधा त्यांना एकदा तिचं ऐकून घ्या म्हणते. आठवले तिथे दुसऱ्याचं ऐकून काय झालंय ते आपण पाहिलं आहे, आता परत मी ते होऊ देणार नाही, जागा फुकट पडून राहिली तरी चालेल पण ती हिला देणार नाही असं बोलून निघून जातात. कार्तिक तिथे आएशाकडेच असतो. कार्तिक तिला तुला मलाच शोधायचं होतं असं तू म्हणाली होतीस विचारतो. तेव्हा आएशा त्याला तुला म्हणजे हार्ट स्पेशलिस्ट शोधत होते, तेव्हा गुगलवर तुझं नाव टॉपला आलं म्हणते. कार्तिक तिथे कुणी आजारी आहे का विचारतो. तेव्हा ती माझ्या हार्टचा प्रोब्लेम सॉल्व करणारा कुणी मिळालं नाही म्हणते. नंतर कार्तिक निघायचं बोलतो. तेव्हा ती हात धरून त्याला बसवते. आणि दिपा तुझी बायको आहे ना विचारते. रात्रभर तू तिचं नाव घेत होतास सांगते. नेटवर तुमचे फोटो पाहिले आणि लग्न टॉक ऑफ द टाऊन होत म्हणते. कार्तिक तिथून निघताना ड्रिक करणं वाईट असं म्हणणार नाही, पण पिऊन रस्त्यावर पडावं एवढं तरी पिऊ नको म्हणते. आणि मी तुला घरी सोडते म्हणते. पण कार्तिक त्याला नकार देतो. आएशा तिच्या आईला फोन करून सगळे अपडेट देते. आएशा तिच्या सिस्टरच्या आणि आईच्या इनसल्टचा बदला नक्की घेणार असं ति फोनवर बोलते.

तिकडे सौदर्या सदानंदला आदित्य-श्वेताला कुठला पत्ता दिलास विचारते. ते तिथे गेले होते असं ती सांगते. सौदर्या त्याला आपण परत तिथे जाऊया म्हणते. सौदर्या ओरडल्याने श्वेता कार्तिकसमोर खोटे अश्रू गाळत असते. श्वेता त्याला तू माझ्याबरोबर आहेस ना आता मी लढणार म्हणते. आदित्य तिला कुणाशी लढणार, ही आपलीच माणसं आहेत म्हणतो. तेव्हा श्वेता घरचं आणि ऑफिसचं खूप नुकसान होत आहे म्हणते. आणि वकिलांकडे म्हणूनच पॉवर ऑफ अटर्नीबद्दल बोलले सांगते. आदित्य तुझ्या नावावर मी ते पेपर बनवून घेतले आहेत, असं ती सांगते. मम्मा फक्त दिपाचा विचार करत आहेत, पण बिझिनेसची जबाबदारी तूच घेतो आहे, म्हणून पॉवर ऑफ अटर्नीवर तुझाच हक्क आहे म्हणते. श्वेता त्याला पावर आणि बिसिजन मेकिंग अथॉरिटी तुझ्याकडे रहावी सांगते. आदित्य तिला मम्मा अजून नीट आहेत तिला हे सगळं करू दे म्हणतो. दिपा त्यावर नाटक करत आदित्यचं मन वळविण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्याचा विचार करून केलं आहे, तू फक्त मम्मांच्या सह्या घे त्यावर म्हणते. आदित्य तिथे ती असं काही करणार नाही म्हणते. श्वेता तिथे मम्माने मेहनत करून हे एम्पायर सुरू केलं आहे, तू आता ते सांभाळतो आहे, त्या सह्या करतील, आणि ते सगळं कसं जुळवून आणायचं ते मी बघते म्हणते.

तिथे सौदर्या दिपाच्या घराजवळ जाते. आठवले ते पाहून सदानंदला ओऱडायला सुरू करतात. सौदर्या त्यांना दिपाबद्दल विचारते. ती इथे रहात असल्याचं मला समजलं. तुम्ही तिला पाहिलं का विचारते. आठवले तिथे अशी कुठली मुलगी इथे राहत नाही म्हणतात. नंतर आठवले सौदर्याला नंबर देता का, अशी कोणती मुलगी दिसली तर मी तुम्हाला कळविन म्हणतात. कार्तिक घरी येतो तेव्हा श्वेता-आदित्य त्याला डिवॉर्सबद्दल विचारतात. तेव्हा कार्तिक तिथे सध्या तो विषय नको, सगळंच मम्माच्या विरोधात नको म्हणतो. नंतर आदित्य पॉवर ऑफ अटर्नीचा तुजा निर्णय़ बरोबर होता सांगते.

मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 25 मेच्या भागात दिपा आठवलेंना जागेवर हॉटेल सुरू करायला कनविन्स करते. आठवले त्याला परवानगी देतात. सौदर्या परत दिपाला शोधत येते. दिपा तिला पाहून लपते. सौदर्या घेत असलेला दिपाचा शोध कधी संपणार ते जाणून घेण्यासाठी पहायला विसरू नका., रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहवर. 


https://youtu.be/Xg1Un0XQhrU