कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव खूप वाढलाय. दुसऱ्या लाटेचा अनेकांना त्रास सहन करावा लागतोय. यासाठी सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आलंय. लॉकडाऊनचे नियम पाळून सुरक्षित रहा अशी विनंती सर्वसामान्यांसह कलाकारही करताना दिसत आहेत. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या माध्यमातून शेंवता म्हणून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने  एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कळकळीची विनंती केली आहे.  यात तिने भगवद् गीतेत कृष्णाने पांडवाना दिलेल्या एका उपदेशाची आठवण करून दिलीय. या व्हिडीओला तिने हे ही दिवस जातील …. सरी सुखाच्या येतील असं कॅप्शन दिलं आहे. अपूर्वाच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिलीय. या व्हिडीओत सगळ्यांना नियम पाळण्याता आवाहन करताना अपूर्वाच्या डोळ्यात पाणी आलंय.