मराठी सिनेसृष्टीतली सुपर मॉम अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर कोठारे तिच्या लूक्सने चाहत्यांना घायाळ करतीये. मुलीच्या जन्मानंतर तिने स्वतःला खूप फिट केलंय. तसंच ती डान्सकडेही लक्ष देते आहे. ऊर्मिला-आदिनाथची मुलगी जिजानेही तिचा फॅनक्लब तयार केलाय. ऊर्मिला जिजाला नेहमची काहीना काही वेगळं शिकवताना दिसते. विविध एक्टिव्हिटी ती करून घेत असते. आता आई उत्तम डान्सर असताना मुलगी कशी मागे राहिल. ऊर्मिलाने मदर्स डे निमित्ताने शेअर केलेला व्हिडीओ आई-मुलीचा डान्स दाखवतो आहे. ऊर्मिला जिजाला डान्स शिकवते आहे. जिजासुद्धा आईला छान फॉलो करतीये.

ऊर्मिला सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. ते प्रेक्षकांना आवडतात.

मम्माने शिकवलेला आणि जिजाने केलेला डान्स तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा