अभिनेता रितेश देशमुख प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. त्याचे आणि जेनेलियाचे लाखो चाहते असून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक असतात. रितेश नेहमी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करताना दिसतं जे प्रेक्षकांना कमालीचं आवडतं. रितेशने आता मदर्स डेच्या निमित्ताने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. आईबरोबर बॅटमिंटन खेळतानाचा व्हिडीओ शेअर करत त्याने हटके मदर्स डे साजरा केला.


रितेशने शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून अनेकांनी कमेंट करत व्हिडीओ क्यूट असल्याचं म्हंटलं. रितेशने पत्नी जेनेलियालाही मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. तिचे आणि मुलांचे फोटो शेअर करत तिला विश केलं.


घरातील पार्टी असूदेत किंवा जेनेलियाची खिल्ली उडवणारे रिल्स. रितेश सगळंच आवडीने शेअर करत असतो. त्याचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात.


रितेश आणि आईचा हा व्हीडीओ तुम्हाला आवडला का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.