मराठी सिनेसृष्टीतली सगळ्यांची लाडकी ‘आर्ची’ म्हणजेच ‘रिंकु राजगुरु’चा आज वाढदिवस आहे. छोट्याशा या रिंकुने ‘सैराट’ सारख्य़ा चित्रपटात दमदार अभिनय कौशल्य दाखवत सगळ्यांनाच ‘याड’ लावत या इंडस्ट्रीत आपलं असं एक अढळ स्थान निर्माण केलं. तिची ची गावाकडची भाषा, तिचा तो गावरान बाज खरच आकर्षित करणारा होता आणि अजुनही आहे. यशाची एक एक पायरी चढत, स्व:ताला ग्रुम करत तिने रिंकुही हॉट दिसु शकते हे दाखवून दिलं.

रिंकुने जाहिरातीमध्येही काम केलं. ‘सैराट’ नंतर तिने ‘मलेसु मालिंगे’ या सैराटच्याच कन्नडा रिमेकमध्येही काम केले. त्यानंतर ‘मकरंद माने’ दिग्दर्शित ‘कागर’ या चित्रपटातुन ‘राणी’ या राजकारण्याच्या अनोख्या भुमिकेतुन ती आपल्यासोमर आली. ‘आकाश ठोसर’सोबत तर ‘सैराट’मध्ये तिने जबरदस्त काम केलं होतंच पण ‘कागर’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘शुभांकर तावडे’या कलाकारासोबतही प्रेक्षकांचं तितकच मनोरंजन केलं. 

प्रत्येक भुमिका ही आपल्याला काहीनाकाही शिकवून जाते, नेहेमीच ती वेगळ्या पद्दतीने आपण कशी साकारु याचा विचार करतच रिंकुने आजपर्यंत तिच्या सगळ्या भुमिका प्रामाणिकपणे वठवल्या. मग ती ‘सैराट’मधली ‘आर्ची’ असो, किंवा ‘मनासु मालिगे’मधील ‘सान्वी’ असो किंवा अलीकडची ‘कागर’मधली ‘राणी’ असो, तिने खुप मेहनत घेत या उंचीचा पल्ला गाठला. इतकच नव्हे तर ‘गणेश पंडित’ दिग्दर्शित ‘मेकअप’ या चित्रपटातुन तर तिचं अनोखं रुपच आपल्याला पाहायला आणि अनुभवायला लवकरच मिळणार आहे. 

रिंकुने जितकं पल्या करिअरला महत्व दिलं तितकच महत्व कायम तिने तिच्या शिक्षणालाही दिलं आहे, नुकतीच ती १२वी ८२ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली. तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्युज आहे, ‘नागराज मंजुळे’ दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात ‘रिंकु’ ‘अमिताभ बच्चन’ सरांसोबत दिसणार आहे. या चित्रपटात ‘आकाश ठोसर’ही असणार आहे.

असं म्हणतात की कोणत्याही कलाकाराचा सिनेसृष्टीत ओळख असली की त्याचा पाय रोवायला वेळ लागत नाही पण या वाक्याचा अर्थ मोडत आपल्या कतृत्त्वार, अभिनय कौशल्यावर आणि मेहनतीच्या जोरावर आज ‘रिंकु राजगुरु’ मराठी सिनेसृष्टीतलं एक कधीही न पुसलं जाणार नाव ठरलं आहे. तसेच कॅमेऱ्याचं काहीही ज्ञान आणि अनुभव नसताना फक्त अभिनयाच्या जोरावर तिने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिला खुप शुभेच्छा देऊयात आणि अनेक चित्रपटातुन, वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमातुन तिने काम करत राहावं, आपलं मनोरंजन करत राहावं हीच शुभेच्छा.