कलाविश्वातले कलाकार त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. जिम, डाएट अशा हेल्थी लाइफस्टाइलकडे त्यांचा कल असतो. परफेक्ट फिगरसाठी त्यांची मेहनत असते. आता मराठी सिनेसृष्टीतील दोन अभिनेत्री एकमेकींच्या वर्कआऊट पार्टनर झाल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे एकत्र वर्कआऊट करतात. त्या दोघींना फिटनेस कोच एकच असल्याने वर्कआऊट त्या एकत्र करतात. सोनाली आणि प्रार्थना दोघीही सोशल मीडियावर त्यांचं फिटनेस रूटीन सांगत आहेत.

या दोघीही वर्कआऊटबरोबरच हेल्थी खाण्याकडेही लक्ष देतात. प्रार्थना नेहमी तिच्या हेल्थी रेसिपी शेअर करताना दिसते. तसंच तीने किकबॉक्सिंगचे धडेही गिरवले होते.

तर सोनाली ही तिची मेहनत आणि त्यामुळे तिला मिळणारे रिसल्ट सांगत असते,.

या वर्कआऊट पार्टनर तुम्हाला आवडल्या का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.