अभिनेता अक्षया वाघमारे आणि योगिता गवळी आई-बाबा झालेत. 7 मे रोजी योगिताने मुलीला जन्म दिलाय. यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. यावर्षी लग्नाचा लग्नाचा वाढदिवस त्यांच्यासाठी खास असणार आहे. अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट करत मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त केला, तसंच आई-मुलगी दोघी हेल्थी असल्याचं सांगितलं. चाहत्यांच्या प्रेमाबदद्ल त्याने सगळ्यांचे आभार मानले.

 अक्षय- योगिताच्या बाळाचा जन्म दादरमधील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. योगिता ही डॅडीअर्थात अरूण गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.


बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, या बाबत बोलताना तो म्हणाला, ‘मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत’. आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. इतकंच नाही, तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे.


काही दिवसांपूर्वी अक्षयने सोशल मीडिया पोस्टवर लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्याने योगितासोबतचा फोटो शेअर करत, ‘आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करतोय. नव्या पाहुण्याच्या आगमानाची वाट पाहात आहेअसं कॅप्शन दिलं होतं.

अक्षय-योगिताचं आमच्याकडून खूप अभिनंदन.