सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मालिकांचं शूटिंग इतर राज्यात सुरू करण्यात आलं. बायो बबलमध्ये रहात कलाकार शूटिंग करतायेत. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील कलाकार ऑनस्क्रीन जितके एकत्र राहतात तितकेच ऑनस्क्रीनही आहेत असं म्हणायला हरकत नाही. या कलाकारांचे बिहांईड द सीन व्हिडीओ तितकेच मस्त आहे. पण ऑनस्क्रीन आपण कधीही पाहणार नाही अशी गोष्ट या मालिकेच्या ऑफस्क्रीन घडली आहे. अरूंधती आणि संजना एकत्र झोका घेण्याची मजा घेत आहेत. अभिनेत्री रूपाली भोसलेने हा व्हिडीओ शेअर केलाय.

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून मिळालेला वेळ टीमने एकत्र एन्जॉय केलाय हे त्यांच्या फोटोवरून दिसतंय.

तसंच मालिकेतील कलाकार नेहमी बॅकस्टेजच्या गोष्टी शेअर करत असतात. पहा त्यांच्या बिहाईंड द सिन्स मूमेंट्स.