झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. प्रेक्षकांची आवड लक्षात घेत या मालिकेच तिसरं पर्व आता सुरू आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडतात. कोकण, नाईक वाडा आणि तिथे घडणाऱ्या भयावह गोष्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकेतील  शेवंता आणि अण्णा नाईक यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. सध्याच्या सिजनमध्येही शेवंता कधी येणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला. अण्णा नाईक ही भूमिका अभिनेते माधव अभ्यंकर साकारत आहे. तर शेवंता ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारते आहे. मालिकेत शेवंतावर जीव ओवाळून टाकणाऱ्या अण्णा नाईक म्हणजेच माधव यांची खऱ्याखुऱ्या आयुष्यतील पत्नीही अतिशय सुंदर आहे. माधव अभ्यंकर यांच्या पत्नीचं नाव श्वेता आहे. माधव पत्नीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

पाहूयात माधव अभ्यंकर यांच्या रिअल लाईफ पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ

माध्यम अभ्यंकर यांचे रेड कार्पेट लूक्सही त्यांची बायकोचं डिझाईन करत असते. बायकोला ते लूक्सचं श्रेय देताना दिसतात,.

 तर अण्णा नाईकांचे हे फोटो कसे आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.