मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी या दोघांनाही करोनाची लागण झाली होती.  नुकताच सुव्रतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच दोघांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितल. सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच दोघांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. पण पॅनिक क्रिएट होऊ नये म्हणून याबद्दल कुणालाही सांगितलं नसल्याचं सुव्रत म्हणाला.

इन्टाग्रामवर सुव्रतने लिहिलं, १२ एप्रिल, आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी मला आणि सखीला हे गिफ्ट मिळाले. आमच्या दोघांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सगळ्यांना चिंता वाटेल म्हणून सुरुवातीला आम्ही कोणालाच सांगितले नाही. आम्ही योग्य ती काळजी घेतली. आता मी हळूहळू थोडा व्यायाम सुरु केला आहे. दोन आठवड्यानंतर आम्ही प्लाजमा डोनेट करण्यासाठी जाणार आहोत. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर मी परेदाशात एका चित्रपटाचे, दोन वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्मच चित्रीकरण पूर्ण केल. आम्ही अमर फोटो स्टुडीओ नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु केले होते. त्यावेळी मी अनेकांच्या संपर्कात आलो होतो. त्यामुळे मला करोना होऊन गेला अस वाटत होत. पण असं नाही. करोनाची लक्षण फार वेगळी आहेत, मी आणि माझ्या जवळच्यांनी पाहिलेला हा सर्वात कठीण काळ होता., सर्वाना विनंती करतो नियम पाळा आणि एकमेकांची काळजी घ्या, असं सुव्रत म्हणाला.

दरम्यान, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत सखी-सुव्रतची भेट झाली होती. 2019मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.