अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या लूक्सकडे विशेष लक्ष देते. अमृताच्या अदा तिच्या चाहत्यांना खूप घायाळ करतात. विशेष म्हणजे तिच्या साडी लूक्सची खूप चर्चा होते. अमृताने आता शेअर केलेली एक रिल्स सगळ्यांच लक्ष वेधून घेते आहे. अमृताने पिवाळ्या रंगाची साडी नेसून एक रिल केली आहे. यामधील तिच्या अदा सगळ्यांना भुरळ पाडत आहेत,.

अमृताची ही रिल खूप चर्चेत असून आत्तापर्यंत दहा लाखांहून जास्त व्ह्यूव्ह्स या रिलला आले आहेत. या लूकमधल्ये तिचे फोटोही खूप सुंदर आहेत.

अमृताचा साडी लूक फेव्हरेट आहे. सणांच्या दिवशी किंवा कार्यक्रमांना ती मस्त साड्यामध्ये दिसते.

अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांबरोबरच तिचे सेलिब्रेटी फ्रेण्ड्सही आवर्जून कमेंट करत तिचं कौतूक करतात.