झी मराठीवरील अग्गबाई सूनबाई या मालिकेने वेगळं वळण घेतलं आगे.

 ह्या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं आहे, ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. अभिजित राजे आणि शुभ्रामध्ये वडील-मुलीचं नातं असल्याचं मालिकेत पहायला मिळतं. शुभ्राने मुलगा बबडुची पूर्ण जबाबदारी घेतल्याने करिअरकडे लक्ष न देता ती पूर्णवेळ घरी थांबून त्याच्याकडे लक्ष देते. शुभ्राच्या प्रोटेक्टिव्ह असण्यामागे कारणही तसं आहे. शुभ्रा गरोदर असताना अपघातात तिचे आई-बाबा गेले त्यामुळे तिच्या डिलिव्हरीमध्ये खूप कॉम्लिकेशन्स आली. तसंच सोहमबरोबच संसार टिकविण्यासाठीही तिची धडपड सुरू आहे.

आता मालिकेत नवा ट्विस्ट येतो. सोहम आणि सुझॅनचं अफेअर शुभ्रासमोर आलंय. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभ्राने दोघांना एकत्र रिसॉर्टमध्ये पाहिलं. या सगळ्याचा प्रकरणाचा मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते. अभिनेता चिन्मय उद्गीरकर अनुरागच्या भूमिकेत पहायला मिळतो आहे. आता हा अनुराग गोखले शुभ्राच्या आय़ुष्यात काय बदल करणार, यामुळे शुभ्राला तिचं आयुष्य नव्याने जगता येईल का हे मालिकेच्या येत्या भागात समजेल.

 

या मालिकेच्या निमित्ताने चिन्मय उदगीरकर पुन्हा एकदा झी मराठी वर पुनरागमन केलं आहे. याआधी चिन्मय झी मराठीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता. पाहायला विसरू नका अग्गबाई सूनबाई सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.