सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने काही नव्या चेहऱ्यांची ओळख महाराष्ट्राला करून दिली. यातली एक म्हणजे शिवाली परब. शिवालीने तिच्या विनोदाची चांगलीच जादू दाखविली आहे. पण यासगळ्याबरोबर फिटनेसही तिचा आवडता विषय आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाली आवडीने योगा करते. त्याचा व्हिडीओ तिने नुकताच शेअर केला.

या मराठमोळ्या मुलीला हिंदी मालिकेतही काम करण्याची संधी मिळाली होती. सोनी टीव्हीवरील सरगम की साडेसाती या मालिकेत ती गुड्डी या भूमिकेत दिसली.