अभिनेत्री प्रार्थना बेहरेंने तिच्या अभिनयाने, गोड हास्याने लाखोंचा फॅनक्लब तयार केलाय. प्रार्थना तिला मिळणाऱ्या वेळेचा वापर करत विविध कला जोपासताना दिसते. 2020मधील लॉकडाऊनपासून तिने चित्रकला जोपासली आहे. तिने नुकतंच कॉल्थ पेंटिंग केलं असून त्याचा व्हिडीओ शेअर केलाय.

माझ्या प्रत्येक पेंटिगमध्ये थोडी मी असतेच असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केलाय.,

याशिवाय काही दिवसांपूर्वी तिने वॉल पेटिंगही केलं होतं.  पेटिंग मला नेहमीच आनंदी करत असं ती नेहमी व्हिडीओ शेअर करताना म्हणत असते.प्रार्थना तिच्या लूक्समध्येही विविध ट्राय करत असते. तिचे साडी लूक्स चर्चेत असतात.

दरम्यान, प्रार्थनाची ही कला तुम्हाला आवडली का हे कमेंट्मसमध्ये सांगायला विसरू नका.