स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतली ईशा म्हणजे अभिनेत्री अपूर्वा गोरे चाहत्यांना अतिशय आवडते. कमी वेळात अपूर्वाने तिचा फॅनक्लब बनवला आहे. तीच्या अभिनयाचं कौतूक होताना दिसतं. आता अपूर्वा सोनी सब वाहिनीवरील वागले की दुनिया या मालिकेत दिसणार आहे.  पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत ती असून त्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काही कारणाने रिसॉर्टमध्ये फसलेल्या अपूर्वा आणि तिच्या बॉयफ्रेण्डला वागले कुटुंब लग्नासाठी मदत करत त्यांचं लग्न लावून देतात असं मालिकेत पहायला मिळेल.. 

अपूर्वाच्या नव्या मालिकेबद्दल तिच्या फॅन्समध्ये उत्सुकता दिसते आहे. अपूर्वा सोशल मीडियावरही हिट आहेत. ईशा विमलच्या म्हणजेच अपूर्वा-सीमाच्या रिल्सला लाखोंनी views येतात.