अभिनेता सिद्धार्थ जाधव गेले अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत त्याच्या विविध भूमिकांनी आपल्या कामाचं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

मराठी सोबतच सिद्धार्थ हिंदी सिनेसृष्टीत मेहनतीने काम करताना दिसतोय.
रणवीर सिंगच्या सिंबा या सिनेमातील सिद्धार्थची पोलिसाची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. आता सिद्धार्थ हा अजून एका हिंदी सिनेमा मध्ये झळकणार आहे. सलमान खानचा राधे हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सलमान खान आणि इद हे समीकरण फार जुनं आहे. येत्या १३ मेला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान चा राधे हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

सध्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलर मध्ये आपल्याला सिद्धार्थ जाधव देखील दिसतोय.
राधे या सिनेमातील सिद्धार्थची भूमिका नेमकी काय आहे हे अजून तरी कळलं नाहीये. पण सिद्धार्थ नेहमीप्रमाणे या सिनेमादेखील काहीतरी हटके भुमिका बजावणार एवढं नक्की आहे. मग तुम्ही सिद्धार्थच्या राधे सिनेमा साठी उत्सुक आहात का. सिद्धार्थची आतापर्यंतची सर्वात आवडती भूमिका कोणती? हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.