अभिनेत्री समृद्धी केळकर हिची सध्या दोन कटींग ही शॉर्ट फिल्म युट्युबवर गाजत आहे. या शॉर्ट फिल्मचा पहिला भाग गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आणि दुसरा भाग काही दिवसांपूर्वी युट्युब वर प्रदर्शित झालाय. 

शॉर्ट फिल्मने युट्युबवर प्रदर्शित होण्याच्या दोन दिवसातच एक लाखापेक्षा जास्त व्युज मिळवलेत.

अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर यांची मुख्य भूमिका असलेली ही शॉर्ट फिल्म लग्न या विषयाभोवती फिरते आहे.

समृद्धी सध्या फुलाला सुगंध या मालिकेत आपल्याला मुख्य भूमिका दिसतेय. समृद्धी ही उत्तम अभिनेत्री तर आहे त्याच बरोबर ती उत्तम मृत्य सुद्धा करते.

समृद्धीची शॉर्टफिल्म तुम्हाला कशी वाटली? समृद्धीची नेमकी कुठली भूमिका जास्त आवडते. समृद्धी तुम्हाला शॉर्टफिल्ममध्ये कि सिरीयलमध्ये आवडते हे आम्हाला कमेंट करून सांगा.