अभिनेत्री माधवी निमकर हे तिच्या फिट अंदाजासाठी नेहमी चर्चेत असते.
लॉकडाऊनच्या काळात सर्वजण आपापल्या घरी आहेत. सर्वजण आपल्या आरोग्याची आणि फिटनेसची योग्य प्रकारे काळजी घेत आहेत.  कलाकार मंडळी देखील फिटनेसची  काळजी घेताना दिसतात.

शुटींगच्या व्यस्त वेळापत्रकातकलाकार मंडळींना स्वतःसाठी फार कमी वेळ मिळत असतो, अशातच त्यांना वेळ मिळाल्यास ते जास्तीत जास्त वेळ हा व्यायामत गुंतवतात.

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री माधवी निमकर हिने देखील घरच्या घरी योगा सुरू केला आहे. माधवीने तिचा योगा करता येण्याचे काही व्हिडिओज पोस्ट केले आहेत.

माधवी आपल्याला  सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी ही भूमिका साकारताना दिसते. माधवी जरी खलनायिकेची भूमिका साकारत असली तरी तिची भूमिका लोकप्रिय आहे.
मग तुम्हाला माधवी चा योगा कसा वाटला. सुख म्हणजे नक्की काय असतं हे मालिका तुम्हाला आवडते का. या मालिकेतील कोणत्या पात्र तुम्हाला जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.