बालक पालक फेम अभिनेता दगडू म्हणजेच प्रथमेश परब हा सध्या टकाटक 2 सिनेमाचं शूट करतो आहे. 2019 चाली प्रदर्शित झालेला टकाटक हा सिनेमा खूप गाजला होता. टकाटक च्या यशानंतर निर्मात्यांनी टकाटक 2 हा सिनेमा बनवण्याचे ठरवले. 

प्रणाली भालेराव, रितिका शोत्री, अभिजित अमकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका सिनेमामध्ये होती.
मात्र प्रथमेशची भूमिका  सर्वांचं लक्ष वेधून घेते.

प्रथमेशला आपण टाइमपास, टाइमपास 2, बालक-पालक, उर्फी, लालबागची राणी, पस्तीस टक्के काठावर पास, झिपऱ्या यासारख्या सिनेमांमध्ये पाहिलयं.. मुर्ती लहान किर्ती महान अशी प्रथमेशची ओळख आहे.
भूमिका कोणतीही असली तरी प्रथमेश हा त्याच्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करतो. 
मग प्रथमेशची आतापर्यंतची तुमची आवडती भूमिका कोणती? हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.