मराठी कलाकारांना वेळोवेळी विविध भूमिका साकाराव्या लागतात, मग पुरुष कलाकारांना आपण अनेकदा पण स्त्रीपात्र साकारताना देखील बघतो.
पुरुष कलाकार हे स्त्री पात्र साकारताना स्त्रियांची नाजुक अदा पात्रात कायम ठेवतात.

अंशुमन विचारे हा सध्या स्त्रीपात्र साकारताना दिसतोय.  एका रियालिटी शोसाठी अंशुमनने हा गेटअप केला आहे.
अंशुमनने  सध्या सोशल मीडियावर स्त्री पात्रातील त्याचे फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोजना तुफान प्रतिसाद मिळतोय. या फोटोज मध्ये अंशुमन हुबेहूब स्त्री दिसतोय.

गुलाबी रंगाची नऊवारी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा असा लुक अंशुमनने केला आहे.फोटो बघितल्यावर एक मिनिट धक्काच बसेल की नेमकी कोणती स्त्री आहे की अंशुमन. मग तुम्हाला अंशुमनचा हा लुक कसा वाटला.
अंशुमन ची आतापर्यंतची तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.