लॉकडाऊन च्या काळात विरंगुळा म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सगळे जण करत आहेत. 
मग पुस्तक वाचन असो, सिनेमा पाहणे असो किंवा स्वतःची कला जोपासणे असो. 2020 च्या लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकारांनी विविध छंद जोपासले होते.

गायन, नृत्य, गार्डनिंग, पेंटिंग अशा विविध कला आपण मराठी कलाकारांना जोपासताना पाहिलं आहे.
काहे दिया परदेस फेम सायली संजीव ही देखील स्वतःची कला जोपासताना आपल्याला दिसते.

सायलीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये घराच्या भिंतीवर सायली वारली पेंटिंग करताना दिसते. पाहा व्हिडिओ.

मग तुम्हाला सायली ची पेंटिंग कशी वाटली.
साईलीला तुम्ही सिरीयल मध्ये मिस करत आहात का? 

सायलीची आत्तापर्यंतची तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.