अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या वेगवेगळ्या पठाडीतल्या भूमिकांसाठी खास ओळखली जाते. प्रियाला आपण काकस्पर्श, टाइम प्लीज, हॅपी जर्नी, आम्ही दोघी, टाइमपास 2 यासारख्या सिनेमांमध्ये पाहिलाय. प्रिया ही 
फिटनेस ओरिएंटेड मराठी अभिनेत्री आहे. मात्र वजनदार या सिनेमासाठी प्रियाने स्वतःचे वजन वाढवलं होतं. 

प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असलेला वजनदार हा सिनेमा 2016साली प्रदर्शित झाला. मात्र सोशल मीडियावर सध्या प्रियाचा वजनदार सिनेमा शूटिंग दरम्यान चा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये वजनदार सिनेमातील गोलू पोलु या गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं. प्रिया  गाणं शूट करत असताना अचानकच काहीतरी बघून कॅमेराच्या दिशेने धावत येते. प्रिया अचानक काय होते का असा प्रश्न व सेट वरील सर्व मंडळींना पडतो. गाण्याचा शूट सुरू असताना सेटवर माकडं आलेली असतात. या माकडांना बघून प्रिया पळते. पहा मजेशीर व्हिडीओ. 

मग प्रियाचा वजनदार हा सिनेमा तुम्ही पाहिला का? प्रियाची वजनदार सिनेमातील भूमिका तुम्हाला कशी वाटते? आतापर्यंत प्रियाची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.