जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे आज निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. किशोर नांदलस्कर यांनी शाळेत असतानाच बाल नाटकात काम करायला सुरुवात केली. अभिनय क्षेत्रातील आवड अधिक निर्माण झाली. 1989 साली इना मीना डिका या मराठी सिनेमामधून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

वास्तव, सिंघम, सिंबा अशा सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये तर थरथराट, शेजारी-शेजारी, येड्यांची जत्रा, बजरंगाची कमाल अशा धमाकेदार मराठी सिनेमांमध्ये त्यांनी विविध भुमिका साकारल्यात. 

जिस देश मे गंगा रहता है या सिनेमा मधील किशोर नांदलस्कर यांची सन्नाटा ही भूमिका खूप गाजली होती.
मग तुम्हाला किशोर नांदलस्कर यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडायची हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

किशोर नांदलस्कर यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले तसेच नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. किशोर नांदलस्कर यांना मज्जा डॉट कॉम कडून आदरांजली.