सुप्रसिद्ध निर्मात्या आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं. सुमित्राजी गेले अनेक दिवस आजारी होत्या पुण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. सुमित्राजींच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. सुमित्रा भावे आणि दिग्दर्शक सुनील सुकथनकर या दोघांनी मराठी सिनेसृष्टीला विविध दर्जेदार सिनेमे दिले आहेत.

संहिता, वेलकम होम, देवराई, वास्तु पुरुष, दहावी फ, कासव, अस्तू अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीला त्यांना पठडी बाहेरच्या सिनेमांची ओळख करुन दिली. 
12 जानेवारी 1943 साली सुमित्रा यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्या त्यानंतर त्या मुंबईला आल्या. मुंबईच्या टीआयएसएस या संस्थेमधून त्यांनी पदवी घेतली. लघुपट हे माध्यम प्रभावी आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुमित्रा यांनी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते.

गेले अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीला विविध सिनेमे देऊन त्यांनी दिग्दर्शिका म्हणून आपल्या कामाचा ठसा सिनेसृष्टीतून ठेवला आहे.  सुमित्रा भावे यांचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडत होता या मला कमेंट मध्ये सांगा.

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात विविध आशयाचे हटके चित्रपट देणारी दिग्दर्शिका म्हणून सुमित्रा भावे यांना मराठी सिनेसृष्टीत नेहमीच लक्षात ठेवेल.