झी मराठी वरील येऊ  'कशी तशी मी नांदायला' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार आपापल्या भूमिका चोख पार पाडताना दिसतात. या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजेच स्वीटु म्हणजेच अन्विता फलटणकर ही देखील तिची भूमिका उत्तमपणे पार पडते. स्वीटुला म्हणजे अन्विताला आपण याआधी टाईमपास, गर्ल्स यासारख्या सिनेमांमध्ये विनोदी भुमिका साकारताना पाहिलयं. तर येऊ 'कशी तशी मी नांदायला' ही तिची पहिलीच मालिका आहे. अन्विता ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तसेच उत्तम गायन सुद्धा करते. सध्या अन्विताने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक व्हिडिओ पोस्ट केलाय, या व्हिडीओमध्ये ती सुरेल गाताना दिसते. पाहा हा व्हिडिओ. तुम्हाला अन्विताचा आवाज आवडला का? अन्विताची स्वीटु भूमिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/mh1eEGTIRPM?start=2" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>