मराठी कलाकार हे नेहमीच सामाजिक भान जपत असतात. याचं एक उत्तम उदाहरण सध्या पाहायला मिळालं आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे.

अनेक प्राणी आपल्याला तहाणलेले दिसतात.  मालिकांच्या सेटवर नेहमीच पाळीव प्राण्यांची ये-जा सुरु असते.
सुख म्हणजे नक्की काय असतं च्या सेटवर गिरीजा प्रभू ला दोन कुत्रे दिसले, तिने त्या कुत्र्यांना गोंजारलं आणि त्यांना पाणी देखील दिलं आहे.  तिने इंस्टाग्राम अकाउंटला एक व्हिडीओ शेअर केलाय. पहा हा व्हिडीओ.

शक्य असेल तसं आपण आपल्या परीने मदत करू असं कॅपशन तिने व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून गिरीजाने नक्कीच एक सामाजिक संदेश लोकांना दिला आहे.  सुख म्हणजे नक्की काय असतं मधली गिरिजाची गौरी भूमिका आवडते का? या मालिकेतील कोणतं पात्रं तुम्हाला जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.