अभिनेत्री रुपाली भोसले बिगबॉस मराठी नंतर सतत चर्चेत असते. रुपालीच्या पर्सनल लाईफ बद्दल तिने बिगबॉसच्या घरात अनेक किस्से शेअर केले होते. सध्या रुपाली आई कुठे काय करते या मालिकेत निगेटिव्ह रोलमध्ये आपल्याला दिसतेय. रुपालीची भुमिका प्रेक्षकांना पसंत पडतेय. रुपाली अनेक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत सोशलमीडियवर  शेअर करत असते. सध्या तिने सोशलमीडियावर मंगळसूत्राचा एक फोटो टाकला आणि तयारी सुरी झाली असं लिहीलं होतं. 

या फोटोला पाहून चाहत्यांना वाटलं की रुपाली पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकते की काय. मात्र तसं नाहीय. रुपालीचा लहान भाऊ संकेत हा लग्नबंधनात अडकतोय.एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने हे स्पष्ट केलं. रुपालीच्या लग्नाच्या चर्चांना पुर्णविराम मिळालं एवढं मात्र नक्की. मग तुम्हाला रुपालीची भुमिका आवडते का? कमेंटमध्ये सांगा.