फॅन्ड्री सिनेमातील शालू म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे शालु ही तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.मात्र काही फोटोज वर चाहत्यांचं जरा जास्तच प्रेम दिसून येतो आणि हे प्रेम व्यक्त करताना कमेंट मध्ये त्यांना भान राहत नाही. राजेश्वरीच्या एका चाहत्याने तिच्या एका फोटो वर कमेंट केली की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पाहिजे. कमेंटला रिप्लाय देत राजेश्वरी म्हणाली आणि माझ्या आयुष्याचं काय? राजेश्वरीचे विविध बोल्ड अंदाजातील फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतात. 

 फॅन्ड्री नंतर राजेश्वरी स्क्रीन पासून लांब आहे मात्र सोशल मीडियावर ती नेहमीच फोटोज् पोस्ट करत असते सध्या तिच्या या रिप्लाय नंतर चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसतोय.  मग राजेश्वरीचे फोटोज कसे वाटले तुम्ही तिला पुन्हा स्क्रीनवर बघण्यासाठी उत्सुक आहात का कमेंटमध्ये सांगा.