आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत साहिल पुन्हा एकदा मॅनेजर कडे येतो आणि रूम ची चावी घेतो,इशा पुन्हा एकदा घरचे किती वाईट आहे हे सांगत असते,साहिल तिला रूम मध्ये घेऊन जात असतो तेवढ्यात देविका तिला हाय करते,इशा ला धक्का बसतो मी फिरत फिरत इथे आले अस इशा बोलते...तेव्हा एकटीच आलीस का अस देविका विचारते तेव्हा साहिल मध्ये पडतो आणि ती एकटी नाही आली,मी आलोय तिच्या सोबत आम्ही दोघे आता adult आहोत अस ही साहिल बोलतो,यावर वय झालाय म्हणजे adult पणाचा शिक्का बसतो याचा अर्थ तुम्ही मोठे झालात अस होत नाही,अस देविका बोलते,तेव्हा इशा मध्ये पडते आणि situation सांभाळत असते,तेव्हा आईने नसतं सोडलं,तिला हे सगळं नाही कळणार अस इशा बोलते तेवढ्यात मागून अरुंधती आणि यश येतात,इशा आणि साहिल घाबरतात,यावर मला खरंच नाही कळणार,मॅक्सय मुलगी माझ्याशी खोट बोलून एक मुलासोबत जाते,ते दोघेही रूम बुक करतात ,आणि मला काहीच नाही कळणार अस अरुंधती बोलते साहिल मध्ये बोलत असतो ती साहिल ला सुद्धा अडवते यश सुद्धा त्याला शांत राहायला सांगतो,यावर तू त्याला का ओरडते, मी त्याला सांगितलं मला कुठेतरी घेऊन चल म्हणून तो आला,यात तुला काय प्रॉब्लेम आहे अस इशा अरुंधतीवर ओरडून बोलते अरुंधती तिला जोरात कानाखाली मारते, खर तर मला हे त्याला मारायचं होतं पण मी दुसऱ्यांच्या मुलांवर हात नाही उचलत आणि मी हे का केलं हे त्याला चोख कळतंय अस अरुंधती बोलते आणि इशाला घेऊन निघून जाते,

इथे घरी अनिरुद्ध आलेला असतो,अरुंधती इशा ला आणायला कुठेतरी गेली आहे अस आज्जी त्याला सांगत असते,यावर अरुंधती उगाच हे वाढवतेय,तिला सिपंथी घ्यायला आवडते अस अनिरुद्ध च मत असतं, तेव्हा आईला जाणीव असते आपलं मुलं कुठे चुकतंय हे आईला कळत असत,तिला एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर ती चुकीची असेल,तू अरुंधती ला दोष देत बसलास तर इशा हाताबाहेर जाईल, आता प्रश्न इशाचा आहे,अरुंधती च्या पन्नास गोष्टी आपल्याला पटत नाही,पण आपण तीच ऐकायला हव अस आज्जी बोलते,

तेवढ्यात अरुंधती इशाला घेऊन येते,काय झालं अस आज्जी विचारते,यावर काही तिचे लाड करायची गरज नाहीये,अस बोलत अरुंधती इशाला ती कुठे गेलेली हे सर्वांना सांगायला सांगते,इशा सगळं सर्वांसमोर बोलते,अरुंधती तिला सगळ्यांसमोर खरं बोलायला सांगते,इशा घाबरत सगळ्यांसमोर खरं बोलते,यावर आई मला माफ करा तुमचं बरोबर होतं, मी म्हंटल होतं मी माझ्या मुलीला वाया जाऊ देणार नाही पण मी कमी पडले,कारण माझा विश्वास होता हिच्यावर,आपल्याला मान खाली घालायला लागेल अस ती कधीही नाही वागणार,पण हे सगळं तिने खोट ठरवलं,पुन्हा एकदा मी जरा जास्त विश्वास ठेवला,यापुढे इशा च्या बाबतीत जे तुम्ही ठरवाल तेच होईल ,मी इशाला नाही सांभाळू शकत हे तिने सिद्ध केलंय अस अरुंधती रडत आज्जीसमोर बोलत असते,अनिरुद्ध इशाला काय झालं विचारतो,यावर देविका सगळी परिस्थिती सांगते तेव्हा मग काय झालं, देविका ने चुगली करण्याची काहीही गरज न्हवती,अस अनिरुद्ध बोलतो...तेव्हा अरुंधती त्याला सगळं खरं सांगते, यावर हे खरं आहे का अस अनिरुद्ध इशाला विचारतो यावर हो हे सगळं खरं आहे,मला आवडतो तो,तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे,तुम्ही सगळे कोणाशी तरी बोलता,मला पण कोणीतरी हवं आहे,माझ्याशी कोणीच बोलत नाही,मला कोणीतरी माझ्यावयाच हवं आहे,माझं पटतं त्याच्याशी,मला सगळं कळतं, मला त्याच्यासोबत जावंसं वाटतं कारण त्याच माझ्यावर प्रेम आहे,माझ्यावर कोणी आता प्रेमच करत नाही अस इशा बोलते यश तिच्यावर ओरडतो तेव्हा हे बघा हेच सगळे माझ्यावर ओरडत असतं,मलाच बोलत असता, तो मला आवडतो कारण तो मला प्रेमाने जवळ घेतो,तुम्ही मला जवळ सुद्धा घेत नाही,मी मला घरातलं वातावरण नाही आवडत,मला नकोय तुमचं डिओर्स व्हायला,म्हणून मी साहिल सोबत बोलते,साहिल माझ्याशी नॉर्मल लागतो,आणि मी लहान नाहीये काय चूक काय बरोबर काय वाईट हे मला सगळं कळतं, मी खरं बोलले असते तर तुम्ही मला बाहेर पाऊल नसतं ठेऊ दिलं, तुमच्या काळजीचा कंटाळा आलाय,तुम्हाला काहीतरी खटकतच असतं आणि म्हणून बाबा संजनाला लपून इतके वर्ष भेटत होते अस इशा बोलते अरुंधती तिच्या अंगावर धावून जाते आणि तिला अडवते,तिला चांगलेच खडेबोल सुनवते, यावर अनिरुद्ध तिला अडवतो आणि जास्त बोलू नकोस या वयात मुलं नादान असतात अस अनिरुद्ध बोलतो यावर त्या रोसॉर्ट मध्ये त्या मुलाने तुझ्यावर जबरदस्ती केली असती तर अस अरुंधती विचारते यावर माझा त्याच्यावर तेवढा विश्वास आहे अस उत्तर इशा देते,यावर अरुंधती हताश होते,इशा तिला समजूनच घेत नसते,अरुंधती तिच्यासमोर हात जोडते,आणि अस काहीही करू नकोस अस बोलत रडत असते यावर ठीक आहे तुझा त्रास तुला काय होतंय याचाच विचार करा तुम्ही तुम्ही हवं तेव्हा काहीही करा,हवं तेव्हा लग्न करा,हवं तेव्हा लग्न मोडा पण मी मात्र मला हवं ते कधीच नाही करू शकत,मला काहीही चॉईस नाहीये उद्या तू निघून जाशील ,संजना या घरात येईल,मला हे सगळं आवडतं की नाही हा प्रश्न सुद्धा कोणाला पडत नाही,आधी तुम्ही तुमचा डिसीजन चेंज करा तुम्ही डिओर्स घेऊ नका,यश गौरीला नाही भेटणार मग मी साहिल ला नाही भेटणार ,तुम्ही तुम्हाला हवं तसंच वागणार आहात ना मग मी पण तशीच वागणार,मी साहिल ला भेटणार आणि जर तुम्ही मला अडवलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करेन आणि मग त्यासाठी तुम्ही सगळे जबाबदार असाल,आई तू असशील अस इशा बोलते आणि वर निघून जाते

उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत इशा जोव देण्याचा प्रयत्न करते नक्की काय घडणार येणाऱ्या भागात जाणून घेण्यासाठी  बघत राहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाह वर