मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचाच्या जोरावर नाव कमवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सर्वांची लाडकी आहे. अमृता ही नेहमीच नवनवीन गोष्टी करत असते. सध्या अमृताने एक हटके फोटोशूट केलं आहे, या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच मोकळे केस सोडलेत. फॅशन फोटोग्राफर खुशबू गुलाटीने तिच्या कॅमेऱ्यात अमृताचे मननोहक फोटोज टिपले आहेत. अमृताने फिल्मफेअर अवॉर्ड फंशनसाठी हा खास रेडी झाली होती. अमृताच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरुन कमेंट दिल्या आहेत, तर मजेशीर बाब म्हणजे अमृताचा नवरा हिंमाशु मणोतरा याने देखील स्वतःच्या पत्नीच्या फोटोवर Stunning अशी कमेंट केली आहे. हिमांशु हा नेहमीच अमृताचे भरभरुन कौतुक करत असतो. दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करतात.

आणि दोघे नेहमी क्युट फोटो शेअर करत असतात. अमृता - हिमांशु
या दोघांची जोडी कशी वाटते? मग तुम्हाला अमृताचा लुक कसा वाटला अमृताची कोणती भुमिका तुम्हाला जास्त आवडते कमेंटमध्ये सांगा.