अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करतेय.  आई कुठे काय करते या मालिकेतील गौरीची भुमिका प्रेक्षकांना विशेष आवडते. गौरीचं खऱ्या आयुष्यातील नाव  गौरी कुलकर्णी आहे. गौरी ही एक उत्तम अभिनेत्री तर आहेच , सोबत एक उत्तम गायिका देखील आहे. गौरी तिच्या गाण्याचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. नुकतचं स्टाप प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्वच कलाकारांनी हटके लुक केला होता. यावेळेस गौरी ग्लॅमरस लुक करण्यात मागे हटली नाही. 

गौरीने पांढऱ्या रंगाची नेटवाली साडी नेसली होती. स्लिव्हलेस आणि बॅकलेस ब्लॉज परिधान केल्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. केस मोकळे सोडून तिने एका बाजून पांढऱ्या रंगाच्या ब्रोचने पिनअप केले होते. गौरीचे हे फोटो सध्या सोशल  मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मग तुम्हाला गौरीचा लुक कसा वाटला, मालिकेतली गौरीची भुमिका तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये सांगा.