अभिनेता सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलु कलाकारांपैकी एक आहे.सिद्धार्थच्या अभिनयाबद्दल त्याच कौतुक कराव तेवढं कमीच आहे. सिद्धार्थ हा विविध पठडीच्या भुमिका अगदी चोखपणे पार पाडतो. त्यातही विनोदी भुमिका असेल तर तो प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतो. सिद्धार्थच्या सिंबा या सिनेमानंतर फक्त मराठी नाही तर हिंदी प्रेक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला लाभला आहे. सिद्धार्थ हा सोशलमिडीयावर सतत लिहत असतो आणि फोटो पोस्ट करत असतो. नुकतचं सिद्धार्थच्या काही चाहत्यांनी 

त्याच्या फोटोवर कमेंटमध्ये मराठीतला सिंबा असं संबोधलं आहे. सिद्धार्थ हा कलरफुल शर्ट आणि विविध प्रकारचे कपडे घालत  असतो. कदाचित त्याच्या याच अंदाजामुळे चाहते त्याला मराठीतला सिंबा बोलत असतील. मग तुम्हाला सिद्धार्थचे वेगवेगळे लुक कसे वाटतात, सिद्धार्थ हा खरचं मराठीतला सिंब म्हणजे रणबीर सिंग आहे का असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करुन सांगा.