६७ वे राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी दिग्दर्शक अभिजित वारंग यांचा आणखी एक सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे. 'देजा वु' या सिनेमाचं नाव असून १ एप्रिलपासून सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे.  नुकतचं या सिनेमाचा पोस्टर रिलीज झालाय. महत्त्वाची बाब  म्हणजे या सिनेमात शरद केळकर आणि अमृता खानविलकर मुख्य भुमिकेत झळकणारत.

 शरदने स्वत: एक सोशलमीडियावर एक पोस्ट शेअर केलीय, त्यात त्याने won't disappoint, ready for next one, are you guys ready असं कॅपशन ही दिलं. पहा ही पोस्ट.


शरदने ब्लॅक अॅण्ड वाईट फोटो शेअर केला असून फोटोतला शरदचा लुक एकदम हटके आहे. पिकासो सारखी दर्जेदार कलाकृती दिल्यानंतर 'देजा वु' ही कलाकृती नेमकी कशी असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अभिजीत यांचं दिग्दर्शन तसेच अमृता आणि शरद सारखी तगडी स्टारकास्ट असल्याने सिनेमा दमदार  होणार यात शंका नाही.