सैराट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु  ही आता एका नवीन भुमिकेत प्रेक्षकांसमोर झळकणार आहे. सैराटनंतर रिंकुने अनेक हिट कलाकृती दिल्या आहेत. रिंकुची आणखी एक कलाकृती आपल्या भेटीसाठी येणारयं. या नवीन प्रोजेक्टमध्ये  ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत ती काम करणार आहे. दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या यांच्या प्रोजेक्टमध्ये रिंकु काम करतेय. कही दिवसांपुर्वी रिंकुने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. 

सध्या या प्रोजेक्टचं नाव गुलदस्त्यात आहे. पण लवकरच  रिंकुचा हटके लुक आपल्याला पहायला मिळणार यात काही शंका नाही. मग तुम्हाला रिंकुची कोणती भुमिका सर्वात जास्त आवडते, रिंकुला नवीन भुमिकेत पाण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? कमेंटमध्ये सांगा.