बाबू या चित्रपटाचा मुहूर्त आणि पोस्टर नुकतचं लॉंच करण्यात आला. पोस्टरवरील रुबाबदार अभिनेता कोण आहे? अशी चर्चा सध्या सोशलमीडियावर आहे. कारण बाबू सिनेमाच्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरमध्ये एकदम हटके आणि रुबाबदार लुकमध्ये दिसणारा अभिनेता अंकित मोहन आहे. अंकित याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. अंकितने स्वत: चित्रपटाचा पोस्टरन आपल्या सोशलमीडियावर शेअर केला आहे. "बाबू नाय, बाबू शेठ" अशी टॅगलाईन या पोस्टरमध्ये दिसतेय. टॅगलाईन पाहून नक्कीच सिनेमात काहीतरी रोमांचक कहाणी असणार एवढं नक्की.

 नुकतचं या चित्रपटाचा मुहुर्त पार पडला. मुहुर्ताच्या वेळेस अंकित मोहन, गायत्री दातार, रुचिरा जाधव, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे, निर्माता बाबू के. भोईर यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती. मग तुम्ही या सिनेमासाठी उत्सुक्त आहात का? सिनेमाचं पोस्टर आवडलं का? कमेंटमध्ये सांगा.