मराठी अभिनेत्री या सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असतात. ते त्यांच्या कामाबद्दल किंवा इतर डेली लाईफ रुटीनबद्दल विविध गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या काही अभिनेत्रींनीनी केलेलं फोटोशुट व्हायरल होतयं, चला तर पाहुया कोणत्या अभिनेत्री आहेत. नंबर एक- पुजा सावंत. 
पुजाने सध्या फिकट गुलाबी रंगाच्या साडीतला फोटो शेअर केला आहे, त्यावर तिने स्लिव्हलेस हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. 

नंबर दोन- प्रार्थना बेहरे  PC: Sarika Bhanage
प्रार्थनाचे केशरी रंगाच्या साडीतले फोटो पोस्ट केले आहेत, आकर्षक असा हिरव्या रंगाचा नेकलेस तिने गळ्यात घातला आहे. त्यातील काही फोटोजमध्ये तिने डोक्यावर अर्धा पदर सुद्धा घेतला आहे. तिचा हा लुक चाहत्यांना जास्त भावला आहे.

नंबर तीन - सोनाली कुलकर्णी PC: @ Bharat Pawar Photography
सोनालीने लाल रंगातल्या साडीवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने गळाबंद नेकलेस घातला आहे, तर तिने घातलेलं नाकातली नथ लक्ष वेधून घेणारी आहे.