देवमाणूस मालिकेत दिवसेंदिवस नवीन वळण पहायला मिळतात. डॉक्टरचा खरा चेहरा हा लवकरच सर्वांच्या समोर येणार अशी उत्तसुक्ता लागलेली असताना डॉक्टर एक-एक करुन सर्व पुराव्यांचा बळी घेत चालला आहे. 

दिव्या सिंगल तिच्या सोबत कार्यरत असलेल्या इंस्पेक्टरला ड्रिंक केल्यामुळे सात दिवस सस्पेंड केलेलं असतं, सस्पेंड टाईममध्ये  इंस्पेक्टरला डॉक्टरबद्दल माहिती घेण्यासाठी गावात फिरत असतो. ही गोष्ट  डॉक्टरला कळते.  डॉक्टर त्या इंस्पेक्टरला पकडतो आणि त्याची हत्या करतो. 

 इन्सपेक्टरच्या फोनवरुन डॉक्टर दिव्या सिंगला मॅसेज सेंड करतो, जेणे करुन कोणाला वाटलं नाही पाहिजे की त्यांची हत्या करण्यात आली. या सर्वात दिव्या फार टेंशनमध्ये येते. कारण तिने  इंस्पेक्टरला सस्पेंड केलेलं असते. 

तरी ती पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत असते जेणे करुन ही आत्महत्या आहे की खुण याचा छडा लागेल. मग तुम्हाला काय वाटतं डॉक्टरचा खरा चेहरा लोकांसमोर येणार का? दिव्या  इंस्पेक्टरच्या हत्याऱ्याला शोधु शकेल का? पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.