सध्या मराठी मनोरंजन वाहिन्याचे पुरस्कार सोहळे सुरु आहेत. प्रत्येक वाहिनी काहीतरी हटके करताना दिसतेय. रेड कार्पेटपासून ते रॉयल एंट्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात तामझाम पहायला मिळते.

कलाकार देखील ग्लॅमरस पद्धतीने हजेरी लावतात. स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड सुरु आहेत. रंग माझा वेगळा मालिकेचे कलाकार हटके अंदाजात दिसले. सर्व कलाकार सोबत सेल्फी घेतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
 

या व्हिडीओमध्ये कार्तिकची वेगळी बाजु पहायला मिळते. कार्तिक म्हणजे आशुतोष हा अवॉर्ड फंक्शनच्या आधी मस्तीच्या मुडमध्ये होता. मस्ती करताना त्याची आई सौंदर्या इनामदार म्हणजेच अभिनेत्री हर्षदा त्याला थांबवते, पण कार्तिक हा मस्तीच्या मुडमध्ये दिसून येतोय. पहा हा व्हिडीओ.