अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार का अशी चर्चा सोशल मिडीयावर होतेय. काही दिवसांपुर्वीच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे लग्नबंधनात अडकले. मग सिद्धार्थचं दुसरं लग्न की काय? अशी सध्या अफवा पसरतेय. याचं मुख्य कारण म्हणजे सिद्धार्थचा नवरदेवाच्या रुपातील एक लुक व्हायरल होतोय. त्याच्यात  त्याने क्रिम कलरची शेरवाणी घातलेली असून राणी कलरचा दुपट्टा परिधान केलाय तसेच आकर्षक पर्पल कलरचा फेटा घातलेला आहे.. रॉयल कारभार असं कॅपशन देत त्याने हा फोटो सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

हा सगळा थाट 'सांग तू आहेस का' मालिकेतील स्वराजच्या लग्नासाठी सुरु आहे. 
वैभवीला या लग्नात मारण्याची धमकी मिळाली आहे. स्वराज डॉ वैभवीला वाचवू शकेल का, स्वराजचं लग्न शांततेत पार पडेल का, की कोणाची नजर लागेल हे सगळं पाहण औत्सुक्याचं ठरेल. 

सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते नेहमीच एकमेकांवरचं प्रेम तिथे दर्शवत असतात. दोघांची जोडी सध्या गाजलेल्या मराठी सेलिब्रिटी एक जोडी आहे.